logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गुजरातमध्ये श्री दत्त शिखर बचावासाठी महाराष्ट्रातून लाखो भक्तांची तयारी

गुजरात : जुलै महिन्यात गुजरातमधील गिरणार येथे श्री गुरु दत्तात्रेय शिखर चरण पादुका गिरणार या पवित्र स्थळी बचावासाठी महाराष्ट्रातून लाखो दत्त भक्त उपस्थित होण्याची तयारी सुरू आहे. प्रमोद (आप्पा) पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, 19 व 20 जुलै रोजी या व्यापक जनजागृती अभियानाचा भाग म्हणून भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील मुंबईमध्ये श्री गुरु दत्तात्रेय समस्त भक्त मंडळाने साताऱ्यात दत्तभक्तांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत गुजरातमधील गिरणार क्षेत्राच्या पवित्रतेचे संरक्षण आणि धार्मिक अस्मितेची जपणूक करण्यासाठी राज्यभरातील लाखो भक्तांना एकत्र आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमात साताऱ्यातील मंदिर महासंघाचे शिवाजी तुपे, शरदचंद्र बर्गे, चंद्रशेखर धने, उदयसेन सुभेदार, ओंकार साठे, तात्या भांगे यांसह अनेक उपस्थित होते. धनकवडी येथील सद्गुरू शंकर महाराज समाधी स्थळी भक्ती भावपूर्ण भेटदेखील देण्यात आली.

12
3469 views

Comment