नांदेड अनुसूचित जाती जमाती आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष उत्तम सोनकांबळे जिल्हाध्यक्षपदी रमेश लोखंडे यांची निवड
नांदेड: अनुसूचित जाती आणि जमाती निम शासकीय संघटनेच्या नांदेड जिल्हा व प्रदेश कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. यामध्ये संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तम सोनकांबळे तर जिल्हाध्यक्षपदी रमेश लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.