logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कु.शिमरन रहिम बेग पोलीस दलात निवड, संजय निकम पुणे जिल्हा बँकेचे चेअरमनपदी निवड..

बारामती: झारगडवाडी गावातील कु. शिमरन रहिम बेग हिची अवघ्या १८ वर्षांच्या वयात मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. याचबरोबर संजय निकम यांची पुणे जिल्हा बँक कामगार पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या दुहेरी यशानिमित्त झारगडवाडी येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रंजना दादासाहेब बोरकर (मा. सभापती पंचायत समिती), पोपटराव निकम (मा. उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती), तंटामुक्ती अध्यक्ष रणजित बोरकर, दादासाहेब बोरकर, आनंदराव मदने, आण्णा सातव, फौजी सतिश कुलाळ, अंकुश निकम, चंद्रकांत बोरकर, नाना बोरकर, दशरथ सोनवणे, गणेश साळुंखे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. शिमरन रहिम बेग व संजय निकम यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

गावातील कन्येने अल्पवयात महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवल्याने ग्रामस्थांकडून ती कौतुकाची पात्र ठरली असून, ती तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.

4
882 views

Comment