झारगडवाडीची कन्या महाराष्ट्र पोलीस दलात; निकम साहेबांच्या निवडीचाही जल्लोष
बारामती:झारगडवाडी गावासाठी अभिमानाची बाब ठरत कु. शिमरन रहिम बेग हिची अवघ्या १८ व्या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलात मुंबई येथे निवड झाली आहे. तसेच संजय निकम यांची पुणे जिल्हा बँक कामगार पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या दुहेरी यशानिमित्त झारगडवाडी येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रंजना दादासाहेब बोरकर (मा. सभापती पंचायत समिती), पोपटराव निकम (मा. उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती), तंटामुक्ती अध्यक्ष रणजित बोरकर, दादासाहेब बोरकर, आनंदराव मदने, आण्णा सातव, फौजी सतिश कुलाळ, अंकुश निकम, चंद्रकांत बोरकर, नाना बोरकर, दशरथ सोनवणे, गणेश साळुंखे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात कु. शिमरन रहिम बेग व संजय निकम साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी दोघांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गावातील कन्येने अल्पवयात महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळविल्याने ग्रामस्थांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, तरुणांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.