logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

परळी वैजनाथ मंदिरातील व्यवस्थेवर भाविकांचे प्रश्नचिन्ह सुरक्षा रक्षकांसह अन्नछत्र कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत नाराजी(बीड)

परळी वैजनाथ मंदिरातील व्यवस्थेवर भाविकांचे प्रश्नचिन्ह
सुरक्षा रक्षकांसह अन्नछत्र कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत नाराजी(बीड)

परळी वैजनाथ : श्री वैजनाथ मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसोबत मंदिर परिसरातील काही खासगी सुरक्षा रक्षक तसेच अन्नछत्रातील कर्मचाऱ्यांकडून उद्धट वर्तन होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. संबंधित सुरक्षा कर्मचारी हे “OOPL Security Force” या खासगी सुरक्षा कंपनीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

भाविकांच्या म्हणण्यानुसार, दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांशी काही महिला व पुरुष सुरक्षा कर्मचारी अरेरावीच्या भाषेत बोलतात. इतकेच नव्हे तर अन्नछत्रामध्ये जेवणासाठी पास वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वर्तनही भाविकांना दुखावणारे असल्याचे आरोप होत आहेत.

एका भाविकाने सांगितले की, “माझे लहान बाळ भुकेमुळे रडत आहे, कृपया लवकर पास द्या,” अशी विनंती केली असता संबंधित कर्मचाऱ्याने “आमची बी लेकरं रडतात, काय करावे?” असे उद्धट उत्तर दिले. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

तसेच मंदिरातील अन्नछत्रात जेवण वाढणाऱ्या काही महिला कर्मचारी, महिला सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्येही वारंवार वाद होत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. काही वेळा कर्मचाऱ्यांमध्येच भांडणे होत असल्याने मंदिरातील शिस्त आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

देशाच्या विविध भागांतून भाविक मोठा खर्च करून आणि श्रद्धेने श्री वैजनाथ मंदिर येथे दर्शनासाठी येतात. प्रत्येक भाविकाची देवाविषयी भावना वेगळी असते. मात्र मंदिरातच अपमानास्पद वागणूक मिळाल्याने भाविकांची भावना दुखावली जात असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधित सुरक्षा कंपनी व कर्मचाऱ्यांना शिस्त, संयम आणि भाविकांशी आदराने वागण्याचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment