*श्रीरामपुरात अल्पवयीन पोरावर अनैसर्गिक अत्याचार...*
*श्रीरामपुरात अल्पवयीन पोरावर अनैसर्गिक अत्याचार...*
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) – अल्पवयीन मुलाशी मैत्री करून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच त्याचे अश्लील व्हिडिओ चित्रिकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात ०५ जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता व पॉक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन पोराच्या फिर्यादीवरून सलमान,अली अब्बास,सलीम,रहीम,इराणी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे सर्वजण येथील इराणी गल्ली परिसरातील रहिवासी आहेत.
सन २०२४ पासून ते आजपर्यंत आरोपी सलमान व अली अब्बास यांनी फिर्यादी पोराशी मैत्री करून त्याच्यासोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले.यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात आले.हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी वारंवार बळजबरीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादित करण्यात आला आहे.
तसेच फिर्यादीच्या नातेवाईक मुलीने आरोपींविरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तक्रार मागे घेतली नाही तर फिर्यादीचा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी आरोपी सलीम ,रहीम,इराणी यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.तक्रार मागे न घेतल्याने संबंधित व्हिडिओ व्हायरल करून फिर्यादीची बदनामी केल्याचाही आरोप आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ करीत असून या विचित्र प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015