शहापूर तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी
शहापूर /साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
शहापूर शहरात पहाटेपासूनच ईदचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. नवीन कपडे परिधान करून मुस्लिम बांधव मशिदींमध्ये नमाज पठणासाठी दाखल झाले होते. शहरातील टेकडी दर्गा येथे व जामा मस्जिद मोहल्ला येथे सामूहिक नमाज अदा करण्यात आली. टेकडी दर्गा येथे मौलाना सीराजुद्दीन अन्सारी यांनी सर्व मुस्लिम बांधवांना संबोधित केले. शहापूर , किन्हवली,धसई, वासिंद, खर्डी ,कसारा डोळखांब, या ठिकाणीही मोठ्या उत्साहात बकरी साजरा करण्यात आली व नमाज पठण करण्यात आली. नमाजानंतर देशात शांतता, सौहार्द, समृद्धी आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष दुआ (प्रार्थना) करण्यात आली. नमाज संपन्न झाल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या., सणाच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विशेष काळजी घेण्यात आली होती. शहरातील मुख्य चौक आणि संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत शहापूर तालुक्यातील मुस्लिम नागरिकांनी हा सण शांततेत आणि उत्साहात साजरा केला.