विहामांडवा येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप
विहामांडवा : लोकप्रिय आमदार विलास संदिपान पाटील भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे विहामांडवा येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरपोच पाच बरास मोफत वाळू वाटप करण्यात येत आहे.
सभापती वैशाली विनोद बोंबले पाटील, जिल्हा परिषद सदस्य नितीन भैय्या तांबे पाटील, पंचायत समिती सदस्य प्रमोद पन्हाळकर आणि ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्यांच्या देखरेखीखाली विहामांडवा येथील सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांना यादीतील प्रमाणे मोफत वाळू देण्यात येत आहे. या उपक्रमाबद्दल विहामांडवा येथील सर्व लाभार्थ्यांनी विलास भुमरे यांचे आभार मानले आहेत.