logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे: जनगणनेच्या कामात शिक्षिका दीपाली तांबे यांचा भीषण अपघातात मृत्यू

पुणे: मावळ तालुक्यात जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षक भगिनी दीपाली सुजित तांबे यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी दीपाली तांबे सध्या चिंचवड, तानाजीनगर येथे वास्तव्यास होत्या आणि अहिरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत होत्या.

त्यांनी जनगणनेच्या महत्त्वाच्या कामात तसेच लहान विद्यार्थ्यांच्या शिक्षणात निष्ठेने काम केले. या दुर्दैवी घटनेमुळे पुणे जिल्हा आणि शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने महामार्गांवरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

0
164 views

Comment