वो आदमी नहीं, एक दौर था, * *जो गुज़रकर भी हिंदुस्तान में ठहर गया." *
"वो आदमी नहीं, एक दौर था, * *जो गुज़रकर भी हिंदुस्तान में ठहर गया." *
२७ मे १९६४ ची पहाट...
*देशाचे पहिले #पंतप्रधान #जवाहरलाल नेहरू दिल्लीतील तीन मूर्ती भवनात होते. मागील काही
महिन्यांपासून त्यांची तब्येत खालावत चालली होती. चीन युद्धानंतरचा मानसिक ताण, अखंड कामाचा ताण आणि वाढते वय... ७४ वर्षांचे त्यांचे शरीर आता थकत चालले
होते.
त्या सकाळी ते नेहमीप्रमाणे उठले. वातावरणात एक विचित्र शांतता होती. पहाटेचा मंद वारा खिडकीतून आत येत होता. टेबलावर काही कागदपत्रे, काही पुस्तके आणि देशाच्या कामाशी संबंधित फाईली पडल्या होत्या. आयुष्यभर देशाच्या भविष्याचा विचार करणारा तो माणूस अजूनही कामापासून दूर गेला नव्हता.
*सकाळचे सहा वाजून पंचवीस मिनिटे... अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला.
त्यांनी वेदनेने हात कपाळाकडे नेला. शरीर अशक्त झाले. जवळच्या लोकांनी धावपळ सुरू केली. डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आले.
डॉक्टर येऊन उपचार चालू झाले, पंडितजी मुर्रर्रीच्छत झाले होते.. कदाचित त्या काही क्षणांत त्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण आयुष्य तरळून गेले असेल.
अलाहाबादमधील बालपण... वडील #मोतीलाल नेहरू यांच्या घरातील वातावरण...
इंग्लंडमधील #शिक्षण...
आणि मग स्वातंत्र्यलढ्याची ज्वाला... #कुटुंब... कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला.. पत्नी कमला सोडून गेल्या, #इंदिरा केव्हा मोठी झाली समजलंच नाही.. "देशाचा संसार करताना घरातला संसार
कसा झाला? याचा विचार करायला वेळच मिळाला नाही...* त्यांनी डोळे मिटलेले असताना विचार केला असेल, आज
देश स्वतंत्र होऊन अवधी सतरा वर्षे झाली होती. पण किती वेगाने दिवस पुढे गेले होते...
*15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री #संसद भवनात उभे राहून "Tryst with Destiny" चे शब्द उच्चारताना आपण अभिमानाने तिरंग्याकडे पाहिले होते.*
शतकानुशतके #गुलाम असलेल्या देशाला **#स्वातंत्र्य' मिळाल्याची घोषणा आपणच केली होती. तो भाग्यवान क्षण भगवंताने आपल्याच नशिबात कोरला
होता.. त्या रात्रीचा उत्साह, जनतेच्या डोळ्यातील आनंदाश्रू, आणि नव्या भारताची स्वप्ने... हे सर्व अजूनही
त्यांच्या मनात जिवंत असावे.
पण स्वातंत्र्यानंतरचा प्रवास सोपा नव्हता.
*फाळणीची रक्तरंजित जखम देशाने सोसली, लाखो
निर्वासितांचे लोंढे सीमेकडे येत होते. #हिंदू #मुस्लिम दंगलींनी देश पेटला होता. आणि त्यातच 'पितृतुल्य
#महात्मा #गांधी यांची हत्या झाली. तो क्षण नेहरूंसाठी अत्यंत वेदनादायी होता.
रेडिओवरून देशाला संबोधित करताना त्यांचा भरून
आलेला आवाज आजही इतिहासात जिवंत आहे, "प्रकाश निघून गेला आहे..." *
त्या दुःखातूनही त्यांनी देशाला सावरले. #वल्लभभाई #पटेल यांच्यासोबत 'संस्थानांचे #विलीनीकरण, नव्या राष्ट्राची उभारणी, #घटना समितीचे काम, #लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी, नवे #मंत्रिमंडळ,
#न्यायव्यवस्था, #निवडणूक आयोग, #वैज्ञानिक संस्था, धरणे, #कारखाने, IITS, #AIIMS, #अणुऊर्जा कार्यक्रम.. कामांचा अक्षरशः डोंगर त्यांच्या
समोर उभा होता. हे सर्व त्यांना स्पष्ट आठवत होतं.. अचानक सरदारजींचे सोडून जाणे मन पिळवटून टाकणारे
होते.. त्यांचा कायमच आधार राहिला होता.. एखाद्या भावापेक्षा अधिक प्रेम करणारा सरदार असा काय सोडून गेला... हा विचार चालू असतानाच त्यांच्या हृदयात प्रचंड वेदना देणारी कळ आली..
पुन्हा क्षणभर शांतता आणि पुन्हा एकदा पारतंत्र्यात ३२६८ दिवस तुरुंगवास भोगलेल्या नेहरुंनीं विचार केला असेल की, आपण पाहिलेला भारत घडतोय का?"
भाखरा-नांगलची धरणे उभी राहत आहेत. कारखान्यांच्या चिमण्या धूर सोडू लागल्यात. जगात नवस्वतंत्र भारताची ओळख निर्माण होत आहे. #अलिप्ततावादाच्या माध्यमातून भारताने स्वतंत्र #परराष्ट्र धोरण उभे
केलेय....
*पण काही जखमा कायम राहिल्या.*
1962 च्या चीन युद्धाने आपल्याला आतून हादरवले होते. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्याकडून झालेला विश्वासघात त्यांना खोलवर वेदना देऊन गेलाय... शरीर थकत चाललेय... मनही थकलेय...
इकडे डॉक्टर प्रयत्न करत होते. खोलीत तणावपूर्ण शांतता होती. देशाचे पहिले पंतप्रधान मृत्यूशी झुंज देत होते. बाहेर सूर्य वर येत होता, पण भारताच्या राजकीय आकाशातील एक तेजस्वी सूर्य मावळतीकडे झुकला
होता.*
आणि मग...
दुपारचे एक वाजून चव्वेचाळीस मिनिटे... त्यांची प्राणज्योत मालवली... तीन मूर्ती 'भवन शांत झाले.
दिल्ली शांत झाली...
आणि काही क्षणांसाठी संपूर्ण भारतही जणू स्तब्ध झाला.
*स्वातंत्र्यलढ्याचा सेनानी, आधुनिक भारताचा शिल्पकार, लोकशाही 'भारताचा पहिला पंतप्रधान इतिहासात विलीन झाला होता...* पण त्यांच्या जाण्यानंतरही त्यांनी घडवलेला भारत पुढे
चालत राहिला...
त्यांच्या निधनाची बातमी देशभर पसरताच संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला. रेडिओवरून वार्ता प्रसारित होताच अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. स्वातंत्र्यानंतरचा भारत ज्यांच्या नेतृत्त्वाखाली उभा राहिला, तो नेता आता नव्हता.
दिल्लीतील तीन मूर्ती भवनाबाहेर हजारो लोक जमा होऊ लागले. "सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, सरकारी अधिकारी... प्रत्येकाला आपल्या
* "पंडितजीं" चे अखेरचे दर्शन घ्यायचे होते. अनेक लोक रडत होते. काही शांतपणे उभे राहून हात जोडत होते.
देशभरात दुकाने बंद झाली. संसद भवनावरचा ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला. रेल्वे स्थानके, गावांचे चौक, शहरांचे रस्ते.. सर्वत्र शोकाचे वातावरण होते.
जवाहरलाल नेहरू यांच्या निधनाची जगभर पसरताच अनेक देशांमध्ये शोक व्यक्त करण्यात आला. कारण नेहरू हे केवळ भारताचे पंतप्रधान नव्हते; ते नवस्वतंत्र राष्ट्रांच्या आशा, अलिप्ततावादी चळवळीचे प्रमुख नेते आणि शीतयुद्धाच्या काळात शांततेचा आवाज मानले
जात होते.*
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी म्हटले की, "नेहरू हे जगातील शांतता आणि लोकशाहीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेते होते.'
अमेरिकन माध्यमांनी त्यांना "Modern India's Architect" असे संबोधले. वॉशिंग्टनमध्ये भारतीय दूतावासावर शोकध्वज फडकवण्यात आला.
सोव्हिएत संघाचे नेते निकिता खुस्चेव यांनी नेहरूंच्या निधनाला "भारत आणि जगासाठी मोठी हानी" म्हटले. मॉस्को रेडिओवर विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. सोव्हिएत नेतृत्वाला नेहरूंबद्दल विशेष
आदर होता, कारण त्यांनी भारत-रशिया संबंध मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते.
ब्रिटनचे पंतप्रधान एलेक डग्लस यांनी नेहरूंना "ब्रिटिश साम्राज्याविरोधात लढणारा पण द्वेष न
बाळगणारा नेता" म्हटले, ब्रिटिश संसदेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक ब्रिटिश वृत्तपत्रांनी
लिहिले की, "गांधीनंतर जगात भारताचा चेहरा जर कोण असेल
तर तो नेहरू होता." '
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गॅमाल ऍबडेल नस्सेर अत्यंत भावूक झाले होते. त्यांनी म्हटले की, "आशिया आणि आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक
महान आवाज हरपला." " *नेहरू, नासेर आणि टिटो हे अलिप्ततावादी चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ मानले जात होते.*
युगोस्लाव्हियाचे नेते जोसिप ब्रोझ टिटो यांनी नेहरूंना "जगातील संघर्ष कमी करण्यासाठी झटणारा नेता"
म्हटले. त्यांनी भारतात प्रतिनिधीमंडळ पाठवले. घानाचे राष्ट्राध्यक्ष क्वामे नकरूमह यांनी आफ्रिकन देशांच्या वतीने शोक व्यक्त करताना म्हटले की, "नेहरूंनी नवस्वतंत्र देशांना आत्मविश्वास दिला." ^
बर्मा (म्यानमार) चे नेते यु नु यांनी नेहरूंना "आशियाई
ऐक्याचा आधार" म्हटले.
जपानमध्येही मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या, दुसऱ्या महायुद्धानंतर आशियात शांतता आणि विकासासाठी नेहरूंनी दिलेल्या भूमिकेची प्रशंसा जपानी
वृत्तपत्रांनी केली. *संयुक्त राष्ट्रसंघात शोकसभा घेण्यात आली. तत्कालीन सरचिटणीस यु थांट यांनी म्हटले की, "नेहरू हे जगातील विवेकबुद्धीचे प्रतीक होते.'
अनेक आफ्रिकी आणि आशियाई देशांमध्ये सरकारी इमारतींवर ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले, कारण त्या काळात स्वातंत्र्य मिळवणाऱ्या देशांसाठी नेहरू हे प्रेरणास्थान होते. त्यांनी वसाहतवादाविरोधात सातत्याने
आवाज उठवला होता.
पाश्चात्त्य आणि साम्यवादी, या दोन्ही गटांमध्ये आदर मिळवणारे नेहरू हे त्या काळातील दुर्मिळ नेते होते. शीतयुद्धाच्या विभाजित जगात त्यांनी भारताला स्वतंत्र भूमिका दिली होती.
त्यांच्या निधनानंतर जगभरातील वर्तमानपत्रांच्या मथळ्यांमध्ये एकच भावना होती... "एक युग संपले.
दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. तीन मूर्ती 'भवनातून भारतीय सेनेच्या गाडीत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. लाखो लोक रस्त्यांच्या दुतर्फा उभे होते. अनेकांच्या हातात तिरंगा होता. काही लोक "पंडित नेहरू अमर रहें" अशा घोषणा देत होते, तर काही
शांतपणे अश्रू ढाळत होते.
अंत्ययात्रा दिल्लीतील प्रमुख मार्गावरून पुढे सरकत होती. तीन मूर्ती भवनातून निघालेली यात्रा राजपथ परिसरातून पुढे गेली. संसद भवन, इंडिया गेट परिसर,
यमुनेच्या दिशेने जाणारे रस्ते.. सर्वत्र प्रचंड जनसमुदाय उसळला होता. अनेक लोक झाडांवर, इमारतींच्या गच्च्यांवर उभे राहून अंतिम दर्शन घेत होते.
भारतीय सैन्याचे तिन्ही दल उपस्थित होते. बंदुकींच्या सलामीने राष्ट्राने आपल्या पहिल्या पंतप्रधानाला निरोप दिला.
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीतील यमुना नदीकाठी असलेली जागा निवडण्यात आली. त्या ठिकाणी हिंदू रीतीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, आज त्या स्थळाला *"#शांतीवन"* म्हणून ओळखले
जाते.
"शांतीवन" म्हणजे शांततेचे वन.* काळ्या संगमरवरी चौथऱ्यावर उभारलेले ते स्मारक आजही नेहरूंच्या स्मृती जपते. देशविदेशातील नेते,
विद्यार्थी आणि पर्यटक तिथे भेट देतात. भारताच्या लोकशाही प्रवासाच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून देणारे ते एक महत्त्वाचे स्मृतिस्थळ मानले जाते.
"नेहरूंची अंत्ययात्रा ही केवळ एका व्यक्तीचा निरोप
नव्हती.* *तो आधुनिक भारताच्या पहिल्या पर्वाचा भावनिक शेवट
होता.*
*या महान नेत्यास भावपुर्ण आदरांजली..🙏🏻💐