logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिर्डी येथे युवा क्रांती फाऊंडेशनचा भव्य मेळावा संपन्न

शिर्डी, दि. २१ मे २०२६ : युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मेळावा पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन, सजावट आणि प्रत्येक बाबीकडे दिलेले लक्ष उपस्थितांना भावले. रविंद्र सूर्यवंशी यांनी महिलांच्या सुरक्षेची ठाम भूमिका मांडली आणि संघटनेची कार्यपद्धती स्पष्ट केली.
कार्यक्रमात महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा व मुंबई अध्यक्षा स्मिता बांदेकर यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्री अहिरे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हेन्द्रे यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम रंगतदार झाला. विविध मान्यवरांनी भाषणे केली आणि मुंबई टीमने श्री राकेश वाघ (राष्ट्रीय महासचिव) यांच्या नेतृत्वाखाली २७ ट्रॉफी जिंकून विशेष गौरव मिळवला. जसविंदर सिंग राणा यांची ठाणे जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

39
1962 views

Comment