logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणीत कामगार सेना आक्रमक जिल्हाध्यक्ष सागर झगरे यांनी दिला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा

बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणीत कामगार सेना आक्रमक
जिल्हाध्यक्ष सागर झगरे यांनी दिला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा

बुलढाणा (सत्य कुटे .) : बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांची वेळोवेळी सोडवणूक करणारे शिवसेना प्रणीत कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर नारायण झगरे यांनी दि. २२ मे रोजी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते याच्या समक्ष सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांना कामगार नोंदणी, नुतनीकरण आणि लाभाचे अर्ज तत्काळ निकाली लावणे या विषयानुषंगाने निवेदन दिले आहे.
सरकारी कामगार अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या प्रमाणे पाच ते सहा महिन्यापासून बांधकाम कामगार यांचे नोंदणी अर्ज तसेच नुतनीकरण आणि त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक लाभाचे अर्ज हे प्रलंबित आहे. त्यामुळे बांधकाम कामगार हे आपल्याला मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहत आहेत. सदर कामे ही तात्काळ मार्गी लावण्यात यावीत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चिखली तालुक्यामधील कामगारांची नुतनीकरण संबंधिची संगणक प्रणाली जवळ पास बंद असते.अर्ज सादर केल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांना कागदपत्रे पडताळणी तारीख दिली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे पडताळणी होऊन सुद्धा काही वेळेस अर्ज नामंजूर करण्यात येतो. त्यामुळे कामगारांना कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही.
मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्या मध्ये ग्रामसेवक हे गावातील कामगारांना ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देत नाही. कामगार अधिकारी यांनी काही उपाययोजना कराव्यात.शैक्षणिक लाभाचे अर्ज विनाकारण त्रुटी मध्ये टाकून नामंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे कामगार शैक्षणिक लाभापासून वंचित राहत आहे. अश्या सर्व बाबींमुळे कामगार फार हवालदिल झाला आहे. तरी सर्व बाबींचा विचार करून कामगारांचे कामे सुरळीत सुरु करावे.अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सागर झगरे यांनी दिला आहे.
निवेदन सादर करताना चांद शाह ( शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष ), विष्णू भगवान गाडेकर ( शिवसेना बांधकाम कामगार सेना तालुका प्रमुख चिखली ) , राजू मोरे, प्रदीप खंदारे यांच्यासह बहुसंख्य बांधकाम कामगार उपस्थित होते.

0
14 views

Comment