logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अंजनगाव सुर्जी : विश्वासराव रामराव चोपडे यांचे निधन

अंजनगाव सुर्जी : शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व विश्वासराव रामराव चोपडे (वय 87, रा. शिक्षक कॉलनी) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते माजी मुख्याध्यापक आणि जिल्हा व व्यवसाय शिक्षण अधिकारी होते तसेच विदर्भातील प्रसिद्ध श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

स्व. विश्वासराव चोपडे हे आय.टी.आय.चे कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री गजानन चोपडे यांचे वडील होते. त्यांच्या अंत्ययात्रेत परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे धाकटे चिरंजीव मिशिगन, अमेरिका येथून तातडीने भारतात दाखल झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

0
1037 views

Comment