logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सोलापूर: ऊस बिल न दिल्यास घरीजाणार नाही शेतकऱ्यांचा मोर्चा.

सोलापूर: (प्रतिनिधी अंबादास गोरे )

२०२५-२६ ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर साखर कारखाना धोत्री येथे हजारो टन ऊस दिला आहे. कारखान्याच्या व्यवस्थापकीय मंडळाकडून त्वरित बिल दिले जाण्याचे आश्वासन असूनही अनेक शेतकऱ्यांचे बिल एक ते दोन वर्षांपासून मिळालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पेरणीच्या दिवसांमध्ये दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित ऊस बिल मिळण्याची मागणी केली.

गेल्या तीन दिवसांपासून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता धाराशिव तुळजापूर अक्कलकोट नळदुर्ग उमरगा अणदूर शहापूर व परिसरातील सर्व गावातील ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी गोकुळ शुगर कारखान्यावर योग्य ती कारवाई करून ऊस बिल त्वरित मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

6
5357 views

Comment