logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बापाने पोटच्या मुलीला संपवल धारदार शस्त्राने वार करून हत्या

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या पोटच्या विवाहित मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी वडील फरार झाला आहे. गायत्री शिंदे असं मृत मुलीचं नाव असून आरोपी बापाचं नाव विनोद वसईकर आहे काल सोमवारी 25 मे रोजी दुपारी गायत्रीने तिच्या आईला फोन करून सांगितलं होतं की, 'मी आणि वडील घरीच आहोत'. पण रात्री जेव्हा आई कामावरून घरी परतली आणि तिने घराचा दरवाजा उघडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. गायत्री रक्ताच्या थारोळ्या जमिनीवर पडली होती. आईनं त्वरित फोन करून आपल्या मुलाला आणि पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांच्या तपासानुसार गायत्रीची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्वरित इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी विनोद वसईकर सकाळी कामावर गेल्यानंतर काही वेळातच पुन्हा घरी परतला होता, आणि दुपारी 4 वाजेच्या सुमारास तो अत्यंत घाईघाईनं इमारतीतून बाहेर पडताना दिसून आला. तेव्हापासून फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तीन विशेष पथकं रवाना केली आहे कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरातील रचना रॉयल इमारतीच्या फ्लॅट क्रमांक 102 मध्ये वसईकर कुटुंब वास्तव्यास आहे. विनोद वसईकर खासगी कामे करतो, तर त्याची पत्नी आणि मुलगा नोकरी करत आहेत. गायत्री शिंदे काही दिवसांपूर्वीचं माहेरी आली होती. तिचं नोव्हेंबर 2025मध्ये लग्न झालं होतं. रविवारी 24 मे रोजी कुटुंबातील सर्वजण एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, स्वतःच्या मुलीची हत्या करण्याएवढं टोकाचं पाऊल विनोदने का उचललं? त्याने मुलीची हत्या का केली? याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. आरोपीला अटक केल्यानंतरच या निर्घृण हत्येमागचा नेमका हेतू स्पष्ट होईल.

26
1248 views

Comment