logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*विक्रीसाठी आणलेल्या 3.1 किलो ग्रॅम गांजा जप्त*

*विक्रीसाठी आणलेल्या 3.1 किलो ग्रॅम गांजा जप्त*

नगर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*)श्री.मुम्मका सुदर्शन,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये पोनि/श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ समीर अभंग, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमाची माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करुन अंमली पदार्थबाबत माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे दादा साहदु दिघे,रा. येळपणे ता. श्रीगोंदा हा त्याचे राहते घरी अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगलेला असल्याची माहिती मिळाली.पथकाने तात्काळ बेलवंडी पोलीस स्टेशन येथे जावुन सपोनि/श्री नंदकुमार सोनवालकर यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता त्यानुसार सपोनि/श्री नंदकुमार सोनवालकर व पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, कैलास सिपनकर नेम. बेलवंडी पोलीस स्टेशन अशांनासह कारवाई करण्याकरीता आवश्यक त्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी व खाजगी वाहनाने निघुन येळपणे गावचे शिवारात दिघे याचे राहते घरी जावुन खात्री करता घरात एक इसम मिळुन आला त्याला नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) दादा सहादु दिघे,वय- 79 वर्षे रा. येळपणे ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. तेव्हा पथकाने झडतीचा उद्देश समजावुन सांगुन झडती घेतली घरामध्ये एक पिशवी मिळुन आली त्यामध्ये उग्र वास येत असलेला व मिश्रीत असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे, बिया असे संलग्न असलेले वनस्पतीचे शेंडे असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आला असुन त्याबाबत ताब्यातील इसमांकडे विचारपुस करता त्याने इसम नामे 2) गौतम कुमार यादव रा. बडगाव शिंदोडी ता.जि. अहिल्यानगर मुळ रा. देसपुर माझी, ता सालिमपुरा, जि.पटना बिहार यांचेकडुन विक्रीकरीता आणलेला असल्याचे सांगितले.
नमुद आरोपींच्या ताब्यातुन 78,000/-रु कि.चा 3.137 कि.ग्रॅम अंमली पदार्थ गांजा, असा एकुण 78,000/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/2574 मनोज मोहन साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बेलवंडी पोलीस स्टेशन गु. र. नं. 188/2026 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
100 views

Comment