*भव्य बैलगाडी मोर्चात सहभाग* अकोला
*भव्य बैलगाडी मोर्चात सहभाग*
अकोला जिल्ह्यात देशातील व महाराष्ट्रातील वाढत्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार,जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा या मोर्चात सम्राट अशोक सेना आकाश दादा शिरसाट सहभाग होऊन नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्यात आला. आकाश दादा शिरसाट यांनी व्यक्त केलेले मत.शेतकरी आज चारही बाजूंनी संकटात सापडला आहे.शेती मशागतीसाठी डिझेल नाही,खतांचा काळाबाजार सुरू,बोगस बियाण्यांचा सुळसुळाट आणि कर्जमाफीची फक्त खोटी घोषणा.देशभरात सातत्याने वाढत असलेल्या या आर्थिक संकटामुळे.
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण बनले आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे.या पार्श्वभूमीवर अकोला शहरात वाढत्या महागाईविरोधात भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.अकोला टॉवर चौक येथील वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने, तेल्हारा,बाळापुर,पातुर,मूर्तिजापूर, बार्शीटाकळी,या तालुक्यातल्या ग्रामीण भागातील नागरिक,शेतकरी,महिला तसेच अकोला शहरातील तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन नागरिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.वाढत्या इंधन दरांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली...
मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध व्यक्त करत भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले असून सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे,असे मत आकाश दादा शिरसाट यांनी या आंदोलन करता वेळेस व्यक्त केले.अकोल्यात महागाई विरोधात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य बैलगाडी मोर्चामुळे शहरातील परिसर काही काळ घोषणांनी दणाणून गेला होता सर्वसामान्य नागरिक या मोर्चाला भावनेच्या आशेने पहात होतं कारण की यात सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न यावर घोषणाबाजी करत होते.गॅस,पेट्रोल,डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तुंचे गगनाला भिडलेले भाव व सततची होणारी दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे.त्या विरोधात अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग होऊन बीजेपी सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला.सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना,पेट्रोल,डीजल टंचाईचा सामना करावा लागत आहे या विरोधातच हा मोर्चा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.!!
या मोर्चात आम्ही सहभाग होऊन बीजेपी सरकारचा विरोधात जाहीर निषेध व्यक्त केले.!!
*वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा*
*या मोर्चात सहभाग झालेले आम्ही*
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य
*आकाश दादा शिरसाट*
*शेतकऱ्यांनी नाही केला पेरा,तर काय खातील धतूरा.?.*
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015