logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*श्रामनणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात अमरसिंह ढाका...* (चैत्यभूमी श्रामनेर शिबिरार्थीचा धम्मदीप बुद्ध विहारात सत्कार.)

*श्रामनणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात अमरसिंह ढाका...*
(चैत्यभूमी श्रामनेर शिबिरार्थीचा धम्मदीप बुद्ध विहारात सत्कार.)

बीड (प्रतिनिधी) श्रामणेर शिबिरातून समता, संयम व शिस्तीचे उत्तम संस्कार मिळतात असे उद्गार अमरसिंह ढाका यांनी मुंबई येथे श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवलेल्या शिबिरार्थींच्या धम्मदीप बुद्ध विहार येथील सत्कार प्रसंगी अनुभव सांगताना प्रतिपादन केले. तथागतांचे तत्वज्ञान त्यांच्या वाणीतून निघालेल्या अनमोल पाली भाषेतील गाथेतून समजतात. गृहस्थी जीवनातील उपासक-उपासिका व बालकाकरता त्यांचे तत्त्वज्ञान समजण्याकरिता भारतीय बौद्ध महासभेने चैत्यभूमी दादर मुंबई येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरात बीड शहरातील भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आयु.अमरसिंह ढाका. ॲड हनुमंत कांबळे जिल्हा पर्यटक संघटक बीड,ॲड चंद्रवदन जाधव धम्म महासंघ अध्यक्ष बीड यांनी सहभाग नोंदवून शिबिरातील आपले अनुभव उपस्थित उपासक -उपासिकांना श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगून त्यांना श्रामनेर शिबिरात सहभाग नोंदवण्यास प्रेरित केले. सत्कार कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयु.बी. एम. जोगदंड, प्रमुख पाहुणे म्हणून बालाघाट येथील श्रामनेर शिबिर संपन्न करून आलेले प्राध्यापक बी.पी सिरसट लाभले होते. महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम भोले, वाचाल तर वाचाल चे अध्यक्ष डी.जी वानखेडे, ॲड तेजस वडमारे, काशिनाथ वाघमारे, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी केले. तथागतांच्या प्रतिमेस पुष्प तर छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाईच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पदीप धुपाने पूजन करून विनम्र अभिवादन करून सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. शिबिरार्थींचा धम्मदीप बुद्ध विहार बीड व महामानव अभिवादन ग्रुप बीड तर्फे पुष्पगुच्छ देऊन हृद सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ॲड चंद्रवधन जाधव म्हणाले की शिबिरातून तज्ञ अशा गुरुजनांकडून म्हणेज जे अनेक वेळा श्रामनेर झालेले होते, तसेच तज्ञ अशा भिकू संघाकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यातून तथागतांची शिकवण, संयम, शांती, मैत्री, बंधुभाव,समता तसेच त्रिसरण म्हणजे काय? चार आर्य सत्य,अष्टांगिक मार्गाचे जीवनातील महत्त्व,10 पारमितांचे पालन करून माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे हे समजले.तथागतांचे ज्ञान किंवा गाथा केवळ वाचन नाही तर जीवनात आचरणात आणल्यास सर्वसाधारण माणूस देखील अरहंत पदापर्यंत पोहोचू शकतो असे सर्व समजलेल्या उपदेशा आधारे स्पष्ट केले. तथागतांच्या काळातील परिस्थिती तसेच चक्रवर्ती सम्राट अशोक ते फुले, शाहू,आंबेडकर यांच्या पर्यंतचा घटनाक्रम उपस्थिताना त्यांना समजावून सांगितला. जगात तथागतांच्या मार्गानेच शांतता लाभेल अशी स्पष्ट मत व्यक्त करून डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे संरक्षण करून समता, बंधुता, मैत्री व न्याय स्थापन करण्यास सदैव संविधानिक मार्गाने वाटचाल करावी असे अनेक उदाहरणाद्वारे सांगितले. ॲड. हनुमंत कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे महत्व, संविधानिक मार्गाचे कार्य करणे कसे गरजेचे आहे हे सांगितले. जी.एम भोले यांनी समता सैनिक दलात तरुणांचा सहभाग कसा नोंदवावा व समता सैनिक दलाची संख्या कशी वाढवावी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व ॲक्शन प्लॅन समजावून सांगितला. कार्यक्रम प्रसंगी मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात शहीद झालेले पोचीराम कांबळे यांच्या सहचारीनी धोंडामाय कांबळे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड तेजस वडमारे यांनी व्यक्त केले तर अंजली वडमारे व धम्मदीप महिला मंडळ ग्रुप ने कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बहुमोल परिश्रम घेतले. कार्यक्रमास अर्चना जाधव, आशाबाई भालेराव, हर्षदा भोसले, सिद्धी भालेराव, पृथ्वी भालेराव बहुसंख्य उपासक उपासिकांची उपस्थिती होती सरणातयणे कार्यक्रमाची सांगता झाली.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

9
14 views

Comment