बीड-जालना रोडवर दुचाकी व एसटी बसची धडक; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
: बीड-जालना रोडवर आज एक अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आपल्या बाजूने जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या कुत्र्याला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन आदळली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.