logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पळून लग्न करणाऱ्यावर शासनाणे करडी नजर ठेवावी... राष्ट्रीय मानवाधिकार व न्याय आयोग ची मागणी..

प्रत्येक आई वडीलाला वाटते कि, आपला मुलगा असो वा मुलगी चांगला शिक्षण घेऊन, स्वतःच भविष्य घडवावं, उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरीं मिळावावी अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. लहानच मोठं करून, कबाळकष्ट करून, पै पै पैसा गोळा करून लहानपणापासून मुलांचा सांभाळ करीत असतात. मोठ्या मायेन आपल्या पिलांना कुशीत घेऊन मातृछाया देत असते. पण पुढे जाऊन बहुतेकदा अस घडते कि, मुलगा, मुलगी एकदा वयात आली कि, आई वडिलांचे संस्कार विसरून जातात. जणू फिल्मी दुनियेच अनुकरण करीत असतात. प्रत्येक आई वडिलांना वाटते कि आपली मुलगी सुखात राहावी. तिला कोणताच त्रास न व्हावा. चांगला कमवता मुलगा पाहून मुलीचं लग्न थाटामाटात लावू अशी पालकांची इच्छा असते. पण आज बहुतेक ठिकाणी अस चित्र पाहवयास मिळते कि, आई वडील राहिले बाजूला, आपल्या आयुष्याचा निर्णय स्वतःच युवक युवती घेताना दिसतात. प्रेमाच्या पोटी पळून जाऊन, लग्न करतात. तो स्वतः पुढे काय करणार, चांगला कमवतो का हा विचार बहुतेक मुली करतच नाही. यामुळे आईवडिलांचा पूर्ण नकार असतो. त्यामध्ये युवक युवती टोकाचे पाऊल उचलून आत्महत्तेचा प्रयत्न करताना दिसतात. मुलगा आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करतो शेवटी घर मनून कधी ना कधी आपल्या घरी यावंच लागते, त्यातून कौटुंबिक वादविवाद जन्माला येतात.यातून मुलगा मुलगी दोघांनाही त्रास सहन करावा लागतो. जेव्हा मुलगा मुलगी जेव्हा लग्नाचा निर्णय घेतात तेव्हा ही बाब घरच्यांच्या लक्ष्यात आणणे गरजेचे असते, किंवा हीच गोष्ट शासनाच्या लक्ष्यात आणून द्यावी यामधून नक्की शासन मार्ग काढून देऊन त्यामध्ये मध्यस्ती करू शकणार. जेणेकरून मोठे वादविवाद होण्याची शक्यता टाळल्या जाईल. आणि जे जबरदस्तीने पळून जाऊन लग्न करीत असतील त्यांच्यावर शासन नजर ठेवणे तितकच गरजेचं आहे. अस मत राष्ट्रीय मानवाधिकार न्याय आयोग जिल्हाध्यक्ष नी व्यक्त केलं आहे.
पळून जातात वर्षभर बाहेर राहतात. मग यामध्ये मुलगी सुरक्षित आहे कशावरून. तिच्या जीवाशी काहीही घडू शकते. मुलगी 18 वर्ष पूर्ण केली याचा अर्थ पालकांच्या विरोधात काहीही करणार का, त्यात पालकांचा अधिकार नाही का?
शासनाणे आंतरजातीय विवाहास मान्यता दिली आहे. त्यामुळे युवक युवती नी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतला पाहिजे. पळून जाऊन कुठूबाची प्रतिष्ठा धुळीस मिळत असते. समाजात बदनामी चे चर्चे सुरु होतात. समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो. त्यामुळे नव्हपिडी तील तरुण - तरुणीनी योग्य निर्णय घ्यावा. आपली प्रतिष्ठा, मानमर्यादा याचा विचार करावा.भविष्यात येणाऱ्या संकटांचा अगोदर चं विचार करावा. यातून कौटुंबिक वादविवाद, आत्महत्या, हाणामारी, हत्या, सामाजिक बदनामी यासारख्या बाबी आटोक्यात येतील..

16
2237 views

Comment