logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी प्रशालेच्या दहावी निकालाच्या यशाबद्दल शिक्षकांचा सन्मान

लोणी : प्रतिनिधी - तेजस वाळुंज
श्री भैरवनाथ विद्याधाम लोणी प्रशालेचा मार्च २०२६ मधील इयत्ता दहावीचा निकाल उल्लेखनीय लागल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद यांचा माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी, शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्ग यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, महसूल विभागाचे उपसचिव डॉ. कैलास गायकवाड, प्रबोधिनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, सचिव डॉ. अविनाश वाळुंज, डॉ. मयूर लोखंडे, नवनीत सिनलकर, माजी सरपंच उद्धव लंके, तंटामुक्ती समिती अध्यक्ष पिंटूशेठ पडवळ, राजेश वाळुंज, हरिचंद्र वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक ढगे सर, साकोरे सर, तांबोळी सर, दाते सर, चौधरी सर, फराटे सर, गोलांडे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरीताई खंडागळे, राहुल भागवत तसेच ग्रामस्थ, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांचे परिश्रम व मार्गदर्शनाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या उत्कृष्ट निकालामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

34
1408 views

Comment