बनावट फेरफार; तलाठ्यावर गुन्हा
शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : बनावट
कागदपत्रांच्या आधारे फेरफार केल्याप्रकरणी येथील तहसील कार्यालयांतर्गतच्या एक तलाठी आणि तत्कालीन मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आहे. येथील तलाठी रामलिंग पाटील
तसेच तत्कालीन मंडळ अधिकारी दिलीप तिघाडे यांनी बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन येथील शेतकरी राहुल संजय व्यंजने यांचा २००१ मध्ये झालेला १ हेक्टर ११ आर जमिनीचा फेरफार २५ वर्षांनी रद्द केला होता. त्यामुळे व्यंजने सदरील तलाठी आणि मंडळ अधिकारी तसेच फेरफार करून घेणारा शेतकरी यांच्या विरोधात निलंगा न्यायालयात धाव घेतली होती.