गडचिरोली ते मानपूर रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती महेश भाऊ चिमुरकर
धानोरा
📰
धानोरा | प्रतिनिधी
धानोरा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून याकडे शासन आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ चिमुरकर यांनी व्यक्त केले आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे अधिक धोकादायक बनत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक वेळा गंभीर अपघात घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर सर्वसामान्य नागरिकांना नाईलाजास्तव अशा भीषण संकटांना सामोरे जावे लागेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दुदैवी घटना टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच आवश्यक त्या उपाययोजना करून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी महेश भाऊ चिमुरकर यांनी शासनाकडे केली आहे.
न्युज रिपोर्टर : राजकुमार माहवे गड़चिरोली