logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रफुल (पप्पू) खंडागळे यांचा मुरबाड येथे भव्य सत्कार

मुरबाड:
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी प्रफुल (पप्पू) खंडागळे यांची नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल, नाभिक समाजाच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. मुरबाड तालुक्यातील नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते आणि समाजातील प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
प्रफुल खंडागळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने ठाणे जिल्ह्यातील, विशेषतः मुरबाड तालुक्यातील नाभिक समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. समाजातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि समाज बांधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी खंडागळे यांचे नेतृत्व मोलाचे ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्याला मुरबाड तालुक्यातील नाभिक महामंडळाचे पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांना पुढील वाटचालीस आणि भावी कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित ठाणे जिल्हाध्यक्ष प्रफुल (पप्पू) खंडागळे यांनी सर्व समाज बांधवांचे आभार मानले. "महामंडळाने आणि समाजाने माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. जिल्ह्यातील शेवटच्या समाज घटकापर्यंत महामंडळाचे कार्य पोहोचवणे आणि त्यांच्या अडीअडचणींना न्याय देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल," असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

240
4536 views

Comment