logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदने झाड कापून रस्ता मोकळा केला

फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीत काल झालेल्या जोरदार वारा व पावसामुळे अशोका झाड रस्त्यावर वाकल्याने परिसरातील रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवक श्री. पप्पू शेठ ढमाळ यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

यानंतर नगरपरिषद अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देण्यात आल्या आणि 22/05/2026 रोजी संबंधित झाड कापून बंद झालेला रस्ता मोकळा करण्यात आला. नागरिकांनी श्री. पप्पू शेठ ढमाळ यांच्या तत्पर कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांच्या त्वरित प्रतिसादाबद्दल आभार मानले.

9
471 views

Comment