logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लाचखोर उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये एक कोटीचे घबाड

जळगाव : अवैध सावकारीबाबतचा
अनुकूल अहवाल पाठविणे व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी दीड लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेला सहकारी संस्थेचा उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी (५६, रा. शांतीनगर भुसावळ) याच्या कॉसमॉस बँकेतील लॉकरमध्ये तब्बल एक कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल आढळला. यात ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोकड आहे. सर्व मुद्देमाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
केला आहे. दरम्यान, याप्रकरणी उपनिबंधक जगदीश बारी व देवीदास धनसिंग पाटील या दोघा आरोपींना न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


जगदीश बारी यांच्या लॉकरमध्ये ९९ लाख ४ हजार ९६० रुपये किमतीचे ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याचे बिस्कीट, ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि १०,५०० ग्रॅम वजनाचे २ हजार ६२५ रुपयांचे चांदीचे दागिने आढळले. असा एकूण १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

6
651 views

Comment