धुळेची तन्वी खैरनार मिस इंडिया एशिया 2026 विजेती
धुळे : धुळे जिल्ह्याच्या तन्वी खैरनारने झारखंडमधील आदित्यपूर येथे झालेल्या प्रतिष्ठित 'मिस इंडिया एशिया 2026' स्पर्धेत विजेतेपद मिळवून राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
तन्वीने देशभरातील विविध राज्यांतील स्पर्धकांमध्ये आपले आकर्षक व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि उत्कृष्ट सादरीकरण यामुळे परीक्षकांचे मन जिंकले. यापूर्वी 'मिस टीन इंडिया' किताब पटकावलेली तन्वीने आता 'मिस इंडिया एशिया 2026' जिंकून आपल्या मेहनत आणि कौशल्याची पुन्हा एकदा दखल घेतली आहे.
तिच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून तिला अभिनंदन मिळत असून धुळेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तन्वी खैरनार ही युवा पिढीला प्रेरणास्थान ठरली असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.