logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

३४ ओटी हेरॉईनसह ५ सराईत तस्कर अटकेत

कल्याण मधील पोलीस उपायुक्तांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या महिन्यात हेराॅईनची (गर्द) तस्करी करणाऱ्या दोन सराईत तस्करांना अटक केली होती. या तस्करांच्या चौकशीतून पोलिसांनी मुख्य तस्करासह तीन तस्करांना अटक केली आहे. या तस्करांकडून एकूण ९ किलो ७६८ ग्रॅमचा ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रूपयांचा साठा पथकाने जप्त केला आहे. मागील अनेक वर्षातील कल्याणच्या पोलिसांनी हेराॅईनची जप्तीची केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

कासिम अब्दुल सत्तार वसईकर (३८, रा. बजाज हाऊस, सावरकर नगर, सरकारी रुग्णालयामागे, गेसरे रोड, शहापूर. (ठाणे), कृष्णा नागप्पा हळेमणी (३६, प्रतीक्षानगर, पोस्ट ऑफिस नंबर २ जवळ, गुरूतेग बहादूरनगर, सायन, कोळीवाडा), अमजद युसुफ पठाण (४७, रा. याकुब मंजिल, अल्लाहू अकबर मस्जिजीजवळ, जेठा कम्पाऊंड, बैलबाजार, कल्याण.) अमजद सध्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील अश्विन हाॅटेलच्या बाजुला असलेल्या जोगेश्वरी इमारतीत राहतो.

गणेशन पुथ्थुस्वामी जंगमार उर्फ आण्णा (७१, प्रतीक्षानगर, सरदारनगर, सायन, कोळीवाडा, मुंबई), सद्दाम गफूर शेख (३२, रा. बैलबाजार, गुलशननगर, गुजराथी शाळेमागे, कल्याण पश्चिम) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अमजद पठाण विरूध्द एकूण २० गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने दाखल आहेत. राजस्थान, अंमली पदार्थ विरोधी विभाग, भिवंडी कोन येथेही गुन्हे दाखल आहेत. कासिमवर तीन, सद्दामवर ७ गुन्हे दाखल आहेत.कल्याण पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक गेल्या महिन्यात सकाळी सात वाजता कल्याण पश्चिम भागात फेरफटका मारत होते. सांगळेवाडी स्मशानभूमीजवळ आल्यानंतर पोलिसांना पाहून पाठीला पिशव्या असलेले दोन इसम पळत जात असल्याचे दिसले. पथकाला संशय आला त्यांनी पाठलाग करून या दोन्ही इसमांना रोखले. कासिम वसईकर, कृष्णा हळेमणी अशी त्यांची नावे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्या पिशव्यांची झडती घेतली. त्यात ३२ कोटी ३२ लाख रूपये किमतीचे ९ किलो २३६ ग्रॅम वजनाचे हेराॅईन (गर्द) पुडक्यांमध्ये गुंडाळलेले आढळले. या तस्करी प्रकरणी हवालदार अमित शिंदे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासा दरम्यान कासिमच्या शहापूर येथील घरातून पोलिसांनी १ कोटी ८५ लाखाचा ५३१ ग्रॅम वजनाचा साठा जप्त केला होता. हे हेराॅईन या गु्न्ह्यातील मुख्य पुरवठादार अमजद पठाण याने हा साठा गणेशन जंगमार याला विक्री व्यवसायाकरीता सज्ज ठेवला होता. त्यामुळे या गुन्ह्यातील मुख्य पुरवठादार अमजद असल्याचे उघड झाले होते. पठाण याच्याकडील अंमली पदार्थ विविध भागात पोहचविण्याचे काम कासिम, गफूर करत होते. तपासाच्या गतीप्रमाणे या पाचही आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने, अंमली पदार्थ विरोधी पथक प्रमुख अनिल गायकवाड, उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, राहुल शिंदे, देवरे, खांडेकर, बिरपन, खरसाण यांनी केली.

19
637 views

Comment