logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कोक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांना झेड प्लस सुरक्षा द्या डॉ. जितीन वंजारे यांची मागणी

कोक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्या — डॉ. जितीन वंजारे यांची मागणी

बीड प्रतिनिधी :

देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, जातीयवाद आणि राजकीय दबावतंत्राच्या विरोधात सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या “कोक्रोच जनता पार्टी” चे संस्थापक अभिजित दिपके यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

डॉ. वंजारे यांनी म्हटले आहे की, सध्याच्या राजकीय वातावरणात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर विविध तपास यंत्रणांचा दबाव आणला जातो. विरोधकांना ईडी, सीबीआय आणि इतर चौकशांच्या माध्यमातून लक्ष्य केले जात असल्याचे चित्र देशात निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सामान्य कुटुंबातील युवक असलेले अभिजित दिपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी “कोक्रोच जनता पार्टी” ची स्थापना केली.

त्यांनी पुढे सांगितले की, बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये जनसंपर्क विषयाचे शिक्षण घेतलेल्या अभिजित दिपके यांनी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक विषमता या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतल्याने देशभरातील युवक त्यांच्याशी जोडले गेले. काही तासांत लाखो सबस्क्राइबर्स मिळवत आज त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तब्बल १५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

डॉ. वंजारे यांच्या मते, अभिजित दिपके यांचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतात वारंवार बॅन होत असून त्यांना धमकीचे फोन आणि संदेशही येत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यांच्या कुटुंबीयांमध्येही चिंतेचे वातावरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

“देशहितासाठी काम करणाऱ्या आणि युवकांचा मोठा पाठिंबा असलेल्या अभिजित दिपके यांना भारतात आल्यानंतर शासनाने मोहन भागवत यांच्या धर्तीवर झेड प्लस सुरक्षा द्यावी,” अशी मागणी डॉ. जितीन वंजारे यांनी केली आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

6
134 views

Comment