जालना: राणीउंचेगाव पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या लांब रांगा
जिल्हा जालना राणीउंचेगाव येथे २२ मे २०२६ रोजी डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या तब्बल एक किलोमीटरपर्यंत लांब रांगा दिसल्या. सध्या शेती कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ट्रॅक्टरसाठी डिझेल वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह तसेच शेती अवजारांसह तासनतास नंबरची वाट पाहत उभे होते. डिझेल मिळवण्यासाठी पहाटेपासूनच पेट्रोल पंपावर गर्दी होती, ज्यामुळे परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली. या रांगेत गुरुपिंपरी, वडगाव, पानेवाडी, अंतरवाली आणि तळेगाव या गावांतील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नियमित डिझेल पुरवठा करण्याची मागणी केली असून, शेतीच्या हंगामात इंधन टंचाई होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.