logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

एसपी. सुदर्शन यांच्या शिंगणापूरातील कर्तव्याचे सर्वसामान्यांकडून कौतुक...

एसपी. सुदर्शन यांच्या शिंगणापूरातील कर्तव्याचे सर्वसामान्यांकडून कौतुक...


शनिशिंगणापूर (शिवप्रहार न्यूज) – जिल्हा पोलीस अधीक्षक सुमक्का सुदर्शन यांनी शनिअमावस्या व शनिजयंतीच्या दिवशी शनिशिंगणापूर येथे स्वतः बंदोबस्तासाठी उभे राहून गर्दी नियंत्रणाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पदाचा कोणताही अहंकार न बाळगता लाखो भाविकांच्या गर्दीत स्वतः बंदोबस्तात उभे राहून त्यांनी वाहतूक व गर्दीच्या नियंत्रणाची जबाबदारी सांभाळली. इतकेच नव्हे तर मंदिर परिसरात पडलेल्या तेलाच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक व पूजा साहित्य स्वतः उचलून स्वच्छतेचा संदेश दिल्याने त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
शनि जयंती आणि शनि अमावस्या हा दुर्मिळ योग एकत्र आल्याने शनिशिंगणापूर येथे लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुमक्का सुदर्शन यांनी स्वतः मंदिर परिसरात जवळपास सहा तास तळ ठोकत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकारी असूनही त्यांनी कोणताही बडेजाव न दाखवता मंदिर परिसरात पडलेला कचरा स्वतः उचलला. तेलाच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक आणि पूजेचे साहित्य गोळा करून त्यांनी स्वच्छता ही केवळ कर्मचाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश दिला.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
840 views

Comment