मुरुड-जंजिरा किल्ला 26/5/2026 पासुन 3 महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद
रायगड जिल्हा: ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मुरुड-जंजिरा किल्ला 26 मे 2026 पासून पुढील ३ महिन्यांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने किल्ल्याच्या देखभाल, दुरुस्ती आणि विविध विकासकामांसाठी हा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत किल्ल्यावर पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार नाही. दरवर्षी हजारो पर्यटक या समुद्रातील अभेद्य किल्ल्याला भेट देतात, त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायावर याचा काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने पर्यटकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर किल्ला पुन्हा खुला केला जाईल. या विशेष अहवालासाठी राहील शाह यांनी माहिती दिली आहे.