Main Bhi Cockroach': देशातील तरुणाईचा सिस्टीमविरोधात अनोखा डिजिटल उठाव!
प्रकाश इंगळे - छत्रपती संभाजीनगर -
सोशल मीडियावर सध्या एका शब्दाने धुमाकूळ घातला आहे, तो म्हणजे 'Crokroch' (Cockroach - झुरळ). एका न्यायालयीन सुनावणीदरम्यान झालेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भारतातील तरुणांनी थेट 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) नावाचा एक उपरोधिक (Satirical) राजकीय गट स्थापन केला आहे. अवघ्या ४ ते ५ दिवसांत लाखो तरुण या मोहिमेत सामील झाले असून 'X' (ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर हा ट्रेंड पहिल्या क्रमांकावर आहे.