दीड लाखाची लाच घेताना उपनिबंधकासह दोघे जाळ्यात
जळगाव : अवैध सावकारीबाबतचा
अनुकूल अहवाल पाठविणे व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी एक लाख ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहकारी संस्थेचे उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी (५६, सं. शांतीनगर, भुसावळ) व जिल्हा बैंक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी देवीदास धनसिंग पाटील (४४, रा. शिवाजीनगर) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी कारवाई केली.
तक्रारदारावर अवैध सावकारीची कारवाई झाली होती. त्याबाबत सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाकडे सुनावणी सुरू होती. याविषयी विचारैपूस करण्यासाठी व सुनावणीची पुढील तारीख विचारण्याकरिता तक्रारदार उपनिबंधक कार्यालयात गेले होते. त्यावेळी
उपनिबंधक जगदीश बारी यांनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये, तसेच सावकारीबाबत चौकशी अहवाल पाठविण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. यावेळी तीन लाख रुपयांमध्ये तडजोड झाली. याविषयी तक्रारदाराने १८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्ली होती. अनुकूल
वकील लावल्याने नुकसान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
पडताळणी केली असता, तुम्ही मागच्या प्रकरणाच्या वेळेस वकील लावला. त्यामुळे आमचे खूप मोठे नुकसान केले म्हणून नकारात्मक अहवाल दिला होता, परंतु आता अनुकूल अहवाल पाठवितो, असे उपनिबंधक बारी यांनी तक्रारदारास सांगितल्याचे समोर आले. त्यानंतर लाचेचा एक लाख ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता खासगी पंटर देवीदास पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले.
लाचेचा पहिला हप्ता देण्यासाठी पंटरने तक्रारदारास बी. जे. मार्केटमधील त्याच्या कार्यालयात बोलावले. त्याठिकाणी लाच घेताना जिल्हा बँक असोसिएशनचे मानद कार्यकारी अधिकारी, खासगी पंटर देवीदास पाटील यांना पथकाने रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी दोघांविरुद्ध जिल्हापेठ
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंत नागरे, पोहेकॉ बाळू मराठे, संगीता पवार, मनोज पाटील, सचिन चाटे यांनी केली.