नारायण जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती
पुरंदर : भ्रष्टाचाराविरोधी संस्थेने Anti Corruption of India मध्ये नारायण (मामा) वामन जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर जाधव यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बहुजन युथ पॅंथरचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाफरभाई सय्यद यांच्या हस्ते नारायण मामा जाधव यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून स्थानिक पातळीवर या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. आगामी काळात भ्रष्टाचाराविरोधात निर्णायक पावले उचलली जातील अशी चर्चा आहे.