logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

"बांबरुड (रा) येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना नुकसान भरपाईसाठी निवेदन देण्यात आले,

"बांबरुड (रा) येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांना नुकसान भरपाईसाठी निवेदन देण्यात आले,

बांबरुड (राणीचे), ता. पाचोरा येथील सर्व शेतकरी आपल्या मार्फत मागणी करीत आहेत की, दिनांक ११ जून २०२५ रोजी परिसरात अतिशय भयंकर वादळी वारा व मुसळधार पाऊस झाला होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील केळी बाग तसेच विविध फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
सदर नुकसानीबाबत मा. तहसीलदार कार्यालय व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित शासकीय अधिकारी व पंच मंडळी यांनी प्रत्यक्ष गावात येऊन पाहणी केली होती. तसेच परिसरातील पत्रकारांनी देखील या घटनेच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.
या आपत्तीमध्ये केवळ शेतीचेच नव्हे तर नागरिकांच्या जनावरांचे गोठे व शेड यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या अस्मानी संकटाची तीव्रता अत्यंत मोठी होती. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, एक वर्ष उलटूनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.
याबाबत गावातील शेतकऱ्यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन झालेल्या नुकसानीची पुरेपूर भरपाई मिळावी, अशी मागणी केली. तसेच उपजिल्हाधिकारी डॉ. चांगदेव हारकर साहेब यांनाही निवेदन देण्यात आले. तसेच 15 जुलै पर्यंत नुकसान भरपाई नाही मिळाल्यास 9ऑगस्ट रोजी पाचोरा तहसील कार्यालय येथे येते उपोषण करणार आहे असे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे
यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून नाना वाघ, संभाजी पाटील , भैय्या नगरदेवळे,आदी शेतकरी उपस्थित होते. निवेदनामार्फत बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

1
58 views

Comment