*इंदापूरात गुणवंतांचा सन्मान : सागर घरत यांची पुणे जिल्हा सचिवपदी निवड...* इंदापूर (संतोष पवार )
*इंदापूरात गुणवंतांचा सन्मान : सागर घरत यांची पुणे जिल्हा सचिवपदी निवड...* इंदापूर (संतोष पवार )
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी इंदापूर येथील गुरुकृपा लॉन्स येथे पुणे जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. बापूसाहेब अडसूळसर, प्रदेशाध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना ,महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील तब्बल ५६ शाळा व महाविद्यालयांमधील २५६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
याच कार्यक्रमादरम्यान पुणे जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी तसेच इंदापूर तालुका कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी प्रा. सागर अशोक घरत सर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले प्रा. सागर घरत हे प्रामाणिक, मेहनती, अभ्यासू आणि होतकरू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. उच्चशिक्षित, निर्भीड आणि सामाजिक समस्यांची जाण असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अफाट जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांविषयी असलेली तळमळ आणि निस्वार्थी कार्य यामुळे समाजात त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून सक्षम नागरिक घडवणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना प्रा. सागर घरत सर म्हणाले,
“एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच समाजातील प्रत्येक घटकासाठी निस्वार्थीपणे काम करत संघटनेची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.”
त्यांच्या निवडीमुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक स्तरांत समाधान व्यक्त करण्यात येत असून आगामी काळात संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015