logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुण्यात धनकवडीतील बालाजी नगर बस स्टॉपवर अक्षय मस्केची गोळीबाराने हत्या

पुणे: धनकवडी परिसरातील बालाजी नगर बस स्टॉपवर माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश मस्केचा भाऊ अक्षय बापू मस्के उर्फ बाळा मस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) याला भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे.

प्राथमिक माहिती नुसार, बाळा मस्के बस स्टॉपवर उभा असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला आणि त्याला जागीच ठार केले. या हल्ल्याला पूर्वनियोजित असल्याचा संशय असून, वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. आंदेकर हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या आकाश मस्केच्या भावाला लक्ष्य केल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.

घटनेनंतर पुणे पोलिसांनी बंदोबस्त वाढवून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. शहरातील वाढत्या गँगवॉरमुळे कायदा व सुव्यवस्थेची चिंता वाढली आहे.

7
292 views

Comment