पुण्यात भरदिवसा गोळीबारातून बाळा मस्केची निर्घृण हत्या
पुणे: धनकवडी परिसरातील बालाजी नगर बस स्टॉपवर माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश मस्केचा भाऊ अक्षय बापू मस्के उर्फ बाळा मस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) याची भरदिवसा गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण करते.
प्राथमिक माहितीप्रमाणे, बाळा मस्के बस स्टॉपवर उभा असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला आणि त्याला जागीच ठार केले. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय असून, वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचा चर्चा सुरू आहे. पोलिसांनी पुणे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.