logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्रात युवा क्रांतीचा भव्य वर्धापन दिन सोहळा

शिर्डी : महाराष्ट्रातील युवा क्रांतीच्या भव्य वर्धापन दिन सोहळ्याचा आयोजन २१ मे रोजी साईंच्या पवित्र नगरी शिर्डीत होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर आणि गावातून हजारो अधिकारी, पदाधिकारी, सदस्य, माता-भगिनी आणि कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. हा सोहळा युवा क्रांतीच्या संघटनेच्या सामर्थ्याचा आणि एकजुटीचा महास्फोट असेल.

संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. रविंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक महासोहळा पार पडणार असून कार्यकर्त्यांना शंभर टक्के उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संघटनेच्या निष्ठा, प्रेम आणि विश्वासाचा महासागर दिसून येईल, तसेच सुरक्षित प्रवासासाठी आणि सूचनांचे पालन करण्यासाठीही आग्रह करण्यात आला आहे.

12
736 views

Comment