logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र राज्यात उष्णतेचा कहर उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत व पशुपक्षी प्राणी हैराण

महाराष्ट्र राज्यात पश्चिम महाराष्ट्र अर्थात अहिल्यानगर पूर्व भाग व बीड जिल्हा उस्मानाबाद जिल्हा पश्चिम भाग या परिसरामध्ये सरासरी तापमान 42° पर्यंत पोहोचलेले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे या भयानक उष्णतेमुळे पशु,पक्षी, प्राणी हैराण झालेले आहेत . पशु,पक्षी प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळेनासे असे झाले आहे, गावोगाव पाण्याच्या सुविधेसाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे . पशु पक्षांना पिण्यासाठी पाण्याचे पान उठे तयार करून पाळीव प्राण्यांना मात्र जागेवरच पाणी उपलब्ध करून दिले जाते . त्याच प्रमाणे शेती कामाची गती मंदावली असून शेतकरी सुद्धा दुपारी 10 -11 नंतर काम बंद करून दुपारनंतर चार वाजता काम सुरू करतात . शेतीतील कामे सुरू करतात .निसर्गाच्या या प्रकोपा पुढे मनुष्य हातबल असून . शासनाने सर्वांना उष्णतेच्या लाटी पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत .

0
35 views

Comment