logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लोणार तालुक्यात डिझेल-पेट्रोल तुटवडा शेतकऱ्यांसाठी गंभीर समस्या

लोणार: खरीप हंगाम सुरू होताच लोणार तालुक्यात डिझेल आणि पेट्रोलच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मान्सूनपूर्व मशागती आणि पेरणीच्या तयारीत असताना पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे ट्रॅक्टर आणि शेतीतील यंत्रे थांबली आहेत.

शेतकऱ्यांना डिझेल-पेट्रोल मिळवण्यासाठी शेजारच्या तालुक्यांमध्ये भटकंती करावी लागत असून, ब्लॅक मार्केटमध्ये महागड्या दराने इंधन विकले जात असल्याचा आरोप आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाया जात आहे. शेतकरी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी करत आहेत.

0
0 views

Comment