*खुनासह जबरी चोरी करणारा आरोपी गुन्हे शाखेकडुन 24 तासात गजाआड*
*खुनासह जबरी चोरी करणारा आरोपी गुन्हे शाखेकडुन 24 तासात गजाआड*
नगर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क* )पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 367/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 309(4) प्रमाणे दिनांक 16/05/2026 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी सिध्देश संदीप खरमाळे,रा. भांडगाव ता. पारनेर यांच्या वडीलांना कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याचे उद्देशाने डोक्यात कोणेतरी हत्याराने मारहाण करुन जीवे ठार मारुन घरातील 12,70,000/-रु कि.चे रोख रक्कम व सोन्याचे दागिणे चोरुन नेले आहे.
ह्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.मुम्मका सुदर्शन,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी सदर घटनास्थळी भेट दिली.पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन केले.
वरील आदेशानुसार पो.नि. किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखील स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ हरिष भोये, संदिप मुरकुटे,पोलीस अंमलदार, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव,बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे,आकाश काळे,विशाल तनपुरे, रमीजराजा आत्तार, अमोल आजबे, प्रकाश मांडगे, भगवान थोरात, चालक उमांकात गावडे, भगवान धुळे, यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणे कामी सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी केली.सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असतांना व्यवसायीक कौशल्याचे आधारे व गुप्तबातमीदारमार्फत पथकास सदरचा गुन्हा हा महेश हनुमंत खरमाळे,रा. भुजबळवस्ती,भांडगाव ता. पारनेर यांनी केला असुन तो भांडगाव ते जामगाव जाणारे रोडने त्याचे लाल काळे रंगाचे मोटार सायकलला पाठीमागे एक बॉक्स दोरीने बांधलेला असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहितीचे आधारे भांडगाव ते जामगाव जाणारे रोडवर तळ्याजवळ सापळा रचुन थांबले असता. तेव्हा एक इसम लाल काळे रगाचे मोटार सायकलवर येतांना दिसला तेव्हा पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) महेश हनुमंत खरमाळे वय-45 वर्षे रा. भुजवळवस्ती,भांडगाव ता.पारनेर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमात सदर गुन्ह्याबाबत विश्वासत घेवुन विचारपुस करता त्याने दिनांक 15/05/2026 रोजी पहाटे मी माझा पुतण्या संदिप भास्कर खरमाळे यास त्याचे राहते घरी जावुन हातोड्याने डोक्यात वार करुन जिवे ठार मारुन त्याच्या घरातील रोख रक्कम चोरुन नेल्याची कबुली दिली आहे.
ताब्यातील आरोपीच्या कब्जातुन 10,29,000/-रु कि.ची रोख रक्कम, 10,000/-रु.की.ची एक मोबाईल,40,000/-रु कि.ची एक मोटार सायकल,मयताचे आधारकार्ड,एक पांढरेरंगाची दोरी असा एकुण 10,84,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.ताब्यातील आरोपी यास गुन्ह्याचे तपासकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करुन अटक करण्यात आले असुन पुढील तपास पारनेर पोलीस ठाणे करीत आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015