logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

NEET पेपरफुटीचा फास आवळला!; CBI ची पुन्हा लातूरमध्ये धडक, प्रा. मोटेगावकरांच्या कार्यालयाची झाडाझडती आता पुढचा नंबर कोणाचा?

“CBI ची ‘नोटीस’ की इज्जत वाचवण्यासाठीची ‘सेटेलमेंट’?NEET पेपरफुटी प्रकरणात लातूरमध्ये रंगली तिखट चर्चा!”

NEET पेपरफुटी प्रकरणात CBI कडून प्रा. शिवराज मोटेगावकरांना पाठवण्यात आलेली ‘नोटीस’ ही खरंच चौकशीसाठी होती की केवळ ‘ईज्जत वाचवण्यासाठी’ केलेली एक सेटेलमेंट?

CBI ची नोटीस आल्यानंतर शहरात अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण ज्यांच्यावर गंभीर संशयाची सावली होती, त्यांच्यावर ना मोठी कारवाई… ना धडक तपास… आणि अचानक प्रकरण शांत! त्यामुळे आता लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे — “ही नोटीस कायद्याची होती की प्रतिष्ठा सांभाळण्याची?”

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाने देशभर खळबळ उडवली होती. पण लातूरमध्ये मात्र काही ‘मोठ्या नावां’भोवती संशयाचे धुके कायम आहे. प्रा. मोटेगावकरांना CBI ने हजर राहण्यास सांगितल्याची माहिती बाहेर आली, मात्र त्यानंतर तपासाची दिशा अचानक बदलल्याची चर्चा रंगू लागली आहे.

राजकीय दबाव, शैक्षणिक लॉबी आणि आर्थिक व्यवहार यांच्या संगनमतातून हे प्रकरण ‘मॅनेज’ तर करण्यात आले नाही ना? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत. कारण सामान्य विद्यार्थ्यांवर कठोर नियम लागू करणारी यंत्रणा, मोठ्या लोकांपुढे इतकी मवाळ का झाली?

“नोटीस दिली म्हणजे कारवाई झालीच असे नाही… कधी कधी ती फक्त समाजाला दाखवण्यासाठीही असते,” अशी दबक्या आवाजात चर्चा आता चहाच्या टपऱ्यांपासून क्लासरूमपर्यंत सुरू आहे.

CBI खरंच निष्पक्ष तपास करत आहे की फक्त काही नावांभोवती ‘औपचारिकतेचा पडदा’ टाकत आहे?
हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला असून, लातूरकरांना उत्तरांची प्रतीक्षा आहे.

13
721 views

Comment