logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे :-जेजुरी पोलीसांची धडक कारवाई; चंदन माफियावर मोठा घाव

पुणे: जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मांडकी येथील पाटील वस्तीमध्ये अनधिकृतरीत्या चंदनाचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी ओंकार लालासाहेब शिंदे (पो. कॉ. क्र. 3086, दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीण) यांनी प्रतिक प्रमोद खुंटे (मांडकी, पाटीलवस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

दिनांक 18 मे 2026 रोजी मांडकी येथील विलास रावजी भोसले यांच्या शेतात आरोपी खुंटे यांनी अज्ञात ठिकाणाहून चोरी केलेले सुमारे 560 किलो वजनाचे चंदनाचे लाकडी ओंडके, कटर आणि 2 लोखंडी ड्रिल मशीन असा ₹28,05,200/- किमतीचा साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26, 41, 42 आणि महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 (सुधारणा 1988) चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. भोंगळे करत आहेत.

6
765 views

Comment