logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

"खासदार बाळ्या मामा म्हात्रे माणुसकीची श्रीमंती मदत नेपाळी बांधवांच्या चिमुरडीच्या ऑपरेशनला २५००० रुपयांचा तातडीचा आधार"

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी

बिल्डिंगमध्ये पाणी सोडणारे आणि गाड्या धुवून आपल्या कुटुंबाचा प्रामाणिक उदरनिर्वाह करणारे एक गरीब नेपाळी बांधव अत्यंत हताश अवस्थेत संतोष शिंदे जिल्हा समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांना भेटायला आले. त्यांच्यासोब मित्र हेमंत सोनवणे हे देखील होते. त्यांनी जेव्हा त्या बापाची व्यथा माझ्यासमोर मांडली, तेव्हा काळीज हेलावले.
त्यांच्या अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरडीला, 'बेबी मंजू' हिला जन्मापासूनच काही शारीरिक आणि जनुकीय त्रास आहेत. नाका-कानाचा गंभीर त्रास आणि त्यातच डॉक्टरांनी परवाच तातडीने तिच्या ऑपरेशनचा सल्ला दिला होता. बिल्डिंगमधील सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन आपापल्या परीने थोडे थोडे पैसे गोळा केले होते, पण ऑपरेशनचा खर्च मोठा असल्याने अजूनही पैशांची खूप नड होती. तो बाप आपल्या लेकीचा जीव वाचवण्यासाठी डोळ्यात पाणी आणून पैशांची जुळवाजुळव करायला वणवण फिरत होता.
आज भिवंडी लोकसभेचे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे साहेब यांचा शहापूर दौरा होता. वेळ न गमावता त्या हताश बापाला संतोष शिंदे यांनी सोबत घेतले आणि थेट साहेबांची भेट घडवून आणली. साहेबांसमोर चिमुरडीचे मेडिकल पेपर्स ठेवले आणि त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली.
नेहमीच सर्वसामान्यांच्या सुखादुःखात धावून जाणाऱ्या बाळ्या मामांनी क्षणाचाही विलंब न लावता संतोष शिंदे यांना विचारले व साहेबांनी तत्काळ त्या गरीब बापाच्या बँक खात्यावर २५,००० रुपयांची आर्थिक मदत जमा केली!
खासदार साहेबांनी तत्परतेने केलेल्या या मदतीमुळे त्या बापाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले ते समाधान आणि मिळालेला मोठा धीर पाहून सगळ्यांचे मन भरून आले. खासदार साहेबांच्या या संवेदनशीलतेमुळे एका अत्यंत गरीब कुटुंबातील लेकीच्या उपचाराला मोठा आधार मिळाला आहे.

11
705 views

Comment