पिंपळनेर परिसरात पेट्रोल-डिझेलसाठी मोठी गर्दी
साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील पेट्रोल पंपांवर आज वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या मागणीमुळे अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहन चालकांनी सकाळपासूनच इंधन भरण्यासाठी गर्दी केली.
अचानक वाढलेल्या मागणीमुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता तसेच पुरवठा कमी होण्याच्या चर्चेमुळे वाहनधारक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्यासाठी पुढे सरसावल्याचे दिसून आले. पेट्रोल पंप प्रशासनाने नागरिकांना शांतता राखून नियमानुसार इंधन घेण्याचे आवाहन केले असून, पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही सांगितले. पोलिस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.