logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तीन लाखांच्या वजनकाट्यासाठी मनपाने मोजले १७ लाख रुपये

जळगाव : जळगाव शहर स्वच्छतेच्या नावाखाली वर्षाला 'तब्बल ७२ कोटी रुपये खर्च केले जात असताना, दुसरीकडे डम्पिंग ग्राउंडवरील वजनकाट्याच्या दुरुस्तीसाठी तीन लाख खर्च करणे किंवा अवघ्या ८ ते ९ लाख रुपयांचा नवीन वजनकाटा खरेदी करणे सोडून, प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत खासगी ठिकाणाहून कचऱ्यांचे वजन करून घेण्यासाठी तब्बल १७ लाख रुपये मोजल्याची धक्कादायक माहिती उपमहापौर मनोज चौधरी यांनी समोर आणली आहे.



डम्पिंग ग्राउंडवरील महापालिकेचा स्वतःचा वजनकाटा सध्या बंद अवस्थेत आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी केवळ ३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. काटा बंद असल्याचा फायदा घेत कचऱ्याचे वजन बाहेरून करून घेतले जात आहे. यासाठी आतापर्यंत १४ लाख ३७हजार रुपये मोजण्यात आले असून, अजून ३ महिन्यांचे बिल देणे बाकी आहे. हा एकूण खर्च १७ लाखांच्या घरात जात आहे.

महापालिकेचा पैसा मोठ्या प्रमाणात वाया गेल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे.आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा मुद्दाही उपमहापौरांनी पुराव्यानिशी उघड केला.

महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले ७ ते ८ कर्मचारी प्रत्यक्षात जळगावात नसून भुसावळ आणि थेट मध्य प्रदेशात वास्तव्याला आहेत.

हे कर्मचारी जळगावात न येता केवळ कागदोपत्री आपली हजेरी दाखवून दरमहा महापालिकेचा लाखो रुपयांचा पगार लाटत आहेत. ही सर्व माहिती पुराव्यांसह प्रशासनाला देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

5
669 views

Comment