logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*देशातील सर्वात मोठ्या खासगी संरक्षण कारखान्याचे २३ मे ला शिर्डीत संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*

*देशातील सर्वात मोठ्या खासगी संरक्षण कारखान्याचे २३ मे ला शिर्डीत संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*

शिर्डी (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*)दि.१८ :- जिल्ह्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत असून शिर्डी येथील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन येत्या २३ मे रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून, या प्रकल्पामुळे आपला जिल्हा देशातील महत्त्वाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक तथा चेअरमन रविकांत यांनी आज शिर्डीत पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल.खाजगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वांत मोठी क्षमता मानली जात असून,*संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान व कच्चा माल स्वदेशी आहे*. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया व मेक फॉर द वर्ल्ड या संकल्पनांना बळ देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे २०० एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत.यामध्ये रॉकेट लाँचर,लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग,स्वयंचलित ड्रोन व विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत.या प्रकल्पांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून त्यापैकी ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. या माध्यमातून सुमारे दोन हजार नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. याच दिवशी प्रतिदिन पंधरा टन क्षमतेच्या बायो-सीएनजी प्रकल्पाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे चार ते पाच हजार तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत.
या उद्घाटनाच्या निमित्ताने २३ व २४ मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या व शंभरहून अधिक सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.जिल्हाभरातून नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील व तरुणांसाठी संरक्षण क्षेत्राला जाणून घेण्याची ही मोठी संधी ठरणार असल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
231 views

Comment