logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नाशिक : दिया धोंगडे अल्पवयीन मुलगी अपहरण प्रकरणात तपास सुरू

नाशिक : कु-हेगांव येथील दिया योगेश धोंगडे (वय 15) या अल्पवयीन मुलीचे 26 मार्च 2026 रोजी अपहरण झाले. दियाच्या वडिलांनी सांगितले की, दिया सकाळी घरात दिसली नाही आणि घर व परिसरात शोध घेतला असता ती सापडली नाही. वाडीव-हे पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनंतरही तपासात प्रगती झाली नाही, ज्यामुळे कुटुंबीयांनी नगर पालिकेचे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अजय वाहने आणि जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांची मदत घेतली.

नाशिक पोलीस ग्रामीण अधीक्षकांना भेटून स्पेशल गुप्तचर विभागाकडून तपास जलद गतीने करण्याचे आश्वासन मिळाले. चेतन गांगुर्डे यांनी पत्रकारांना सांगितले की, मराठा समाजाच्या या कुटुंबाच्या प्रकरणाकडे इतर राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाने समाजातील न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. जर 24 मे 2026 पर्यंत तपासात प्रगती झाली नाही तर वाडीव-हे पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

18
1209 views

Comment